Pimpri Crime | पैसे देण्यास नकार दिल्याने सत्तूरने 32 वार, तरुण गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime | पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने 26 वर्षीय तरुणावर चिकनच्या दुकानातून चिकन तोडण्याचा सत्तूर आणून 32 वेळा सपासप वार करत गंभीर जखमी केले. हि घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Crime) शनिवारी (दि.17) सकाळी आकुर्डी येथील सुखवानी प्लाझा बिल्डिंग समोरील रोडवर घडली. भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नबीन दानबहादुर कुंअर (वय- 26 रा. अरुणोदय बंगला, से.नं. 27 भेळ चौक, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव असून याप्रकरणी अक्षय पुरुषोत्तम जाधव (वय 26, रा. मारुती मंदिराशेजारी, आकुर्डी गावठाण) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

आकुर्डी येथील सुखवानी प्लाझा (akurdi, Sukhwani Plaza Akurdi) बिल्डिंग समोरील रस्त्याने नबीन हा शनिवारी सकाळी 9.15 वाजता जात होता. त्यावेळी अक्षय तेथे आला. दोघेही एकमेकांना ओळखत होते. अक्षयने नबीनला आवाज दिला आणि पैशांची मागणी केली. मात्र नबीनने पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडून जाऊन अक्षयने शेजारीच असलेल्या चिकनच्या दुकानामधून (chicken Shop) चिकन तोडायचा लोखंडी सत्तूर आणून नबीनच्या डाव्या खांद्यावर 22 तर डाव्या हातावर 10 असे एकूण 32 वार केले. याबाबतचा अधिक तपास निगडी पोलीस (nigdi police) करत आहेत.

हे देखील वाचा

High Court | लिव्ह इनमुळे केलीली बडतर्फीची कारवाई उच्च न्यायालयाकडून रद्द

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Mantra For Good Luck | रोज सकाळी उठताच करा ‘या’ 3 मंत्रांचा जप, प्रत्येक दिवस होईल शुभ; होतील सर्व कामे

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Crime | attempt to murder of youth in nigdi area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update