Pimpri Crime News | भोसरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; पेट्रोलपंप मालकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News । भोसरी (Bhosari) येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना (13 जुलै) मंगळवारी घडली आहे. तेजस सूर्यकांत तावरे (वय, 23 रा. भोसरी, मूळ रा. लिंगी पिंपळगाव, जि. उस्मानाबाद) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पेट्रोलपंप मालकाला पोलिसांकडून (Pimpri Crime) अटक करण्यात आली आहे. गणेश सुरेश लांडगे (वय, 28 रा. इंद्रायणीनगर, भोसरी), असं अटक केलेल्या पेट्रोलपंप मालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, याप्रकरणी अमरजा सचिन पालकर (रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली), यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) याबाबत फिर्याद दिली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथील सदगुरुनगर येथे लक्ष्मी एनर्जी ॲण्ड फ्यूल पेट्रोल पंप आहे. आरोपी गणेश लांडगे (Ganesh Landage) हा या पंपाचा मालक आहे. त्या पंपावर मृत तेजस तावरे (Tejas Taware) यानं पैशांची अफरातफर केल्याचे म्हणत आरोपी लांडगे यांनी तेजस याला बोलावून घेतले. नंतर त्याने त्याच्या ऑफिसमध्ये तेजसला मारहाण केली. आणि त्याची दुचाकी, मोबाइल आरोपीने काढून घेतला. यांनतर तुझ्या आईवडिलांना फोन करून सांगून पोलीस केस करतो, अशी धमकी आरोपी गणेश लांडगेने दिली. तेजस याच्यावर आरोपीने दबाव टाकून त्याला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केले.

दरम्यान, तेजसने आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्याला
रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाला. तेजसने
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. मृत तेजस याची बहीण अमरजा पालकर यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गणेश लांडगे याला पोलिसांनी अटक (Arrested) केलीय.

हे देखील वाचा

Obesity | विवाहानंतर 80 % स्त्रिया लठ्ठ का होतात? 5 कारणे ऐकल्यास तुम्ही देखील म्हणाल हे सत्य आहे, जाणून घ्या

Solapur News | ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने-सुधीर महाजन यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुक्रवारी गौरव सोहळा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Crime | bhosari youth commits suicide petrol pump owner arrested forced suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update