Pimpri Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि साथिदारांवर सावकारीचा व खंडणीचा गुन्हा दाखल

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pimpri Crime |औंध (Aundh) परिसरातील उद्योजक नानासाहेब शंकर गायकवाड Nanasaheb Gaikwad (रा. एन.एस.जी. हाऊस, औंध) आणि त्यांच्या साथिदारांविरोधात सांगवी पोलीसात (Sangvi police) खंडणी (Ransom) आणि महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार (Maharashtra Lenders Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम परत करुन देखील लाखो रुपये मागून त्याबदल्यात घर नावावर करण्यासाठी बळजबरीने वकिलाच्या कार्यालयात नेऊन सह्या घेतल्याचा, आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सांगवी पोलिसांनी (Sangvi Police ) अद्याप कोणालाही अटक (Pimpri Crime) केली नाही.

नानासाहेब शंकर गायकवाड, केदार उर्फ गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे. रा. औंध पुणे), सचिन गोविंद वाळके (रा. विधातेवस्ती, बाणेर), राजू दादा अंकुश उर्फ राजाभाऊ (रा. पिंपळे निलख), संदीप गोविंद वाळके (रा. विधातेवस्ती, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महेश पोपट काटे (वय-39 रा. काटेनगर, पिंपळे सौदागर सध्या रा. स्वराज निवास,
बल्लाळेश्वर नगर, पाली, ता. सुधागड, जि. रायगड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना 13 सप्टेंबर 2017 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत फिर्यादी यांच्या घरी आणि बाणेर येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्यादी महेश काटे यांनी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून पैसे घेतले होते. ते पैसे त्यांनी गायकवाड यांना परत केले होते.
तरी देखील आणखी 80 ते 85 लाख रुपये असल्याचे सांगत काटे यांना पैशांची तजवीज करण्यास सांगितले.
नाहीतर पिंपळे सौदागर येथील जमीन व घर आरोपींच्या नावावर करुन दे,
असे म्हणून आरोपींनी वेळोवेळी काटे यांना धमकावले.

 

तसेच सचिन वाळके आणि संदिप वाळके यांनी काटे यांना त्यांच्या राहत्या घरातून कागदपत्रासह फॉर्च्यूनर कारमधून (Fortuner car) जबरदस्तीने अ‍ॅड. चंद्रकांत नाणेकर (Adv. Chandrakant Nanekar) यांच्या कार्यालयात घेऊन गेले.
त्याठिकाणी आरोपींनी काटे यांना शिवीगाळ करुन बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी बनवलेल्या बनावट कागदपत्रांवर काटे यांच्या सह्या घेतल्या.
यानंतर फिर्यादी काटे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गायकवाड आणि त्यांच्या साथिदाराविरोधात तक्रार दाखल केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे (Police Inspector Ranganath Unde) करीत आहेत

 

Web Title : Pimpri Crime | businessman Nanasaheb Gaikwad and his accomplices were charged with money laundering and extortion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Pune Police | पुणे शहरासह जिल्ह्यात वाहन चोरी करणारे त्रिकुट गजाआड, 10 दुचाकीसह रिक्षा जप्त

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी