Pimpri Crime | वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍याच्या अंगावर सोडले कुत्रे

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – (Pimpri Crime) – थकबाकी असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचार्‍याच्या अंगावर कुत्रा सोडण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चाकण पोलिसांनी (Chakan Police) सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खेड तालुक्यातील शेलगाव येथील दाम्पत्यावर गुन्हा (Pimpri Crime) दाखल केला आहे. Pimpri Crime | Dogs left on MSEDCL employee who went to cut off power supply

अश्विनी विनोद दुधावडे व विनोद राजेश दुधावडे (रा. शेलगाव, ता. खेड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शेलगाव येथे राहणार्‍या एका २८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी आरोपी यांना वारंवार समज देऊन महावितरणाची (MSEDCL) थकबाकी भरण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ती भरली नाही. त्यामुळे फिर्यादी या १३ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेल्या होता. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या अंगावर दगड फेकून मारला आणि कुत्रे अंगावर सोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलीस उपनिरीक्षक झेंडे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pimpri Crime | Dogs left on MSEDCL employee who went to cut off power supply

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

PM Modi उद्या गुजरात मधील विविध महत्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण व नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करणार (Photos)

Solapur News | ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने-सुधीर महाजन यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुक्रवारी गौरव सोहळा

Mastercard Barred | RBI ने मास्टर कार्डवर आणली बंदी ! बँक जारी करू शकणार नाही Master Debit आणि Credit Card, आता काय होणार कोट्यवधी ग्राहकांचे

Charge devices | घामाने तयार होईल 24 तास वीज, फोन सुद्धा होऊ शकतो चार्ज : रिसर्च