Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

पिपंरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime | शेतात कामाला गेल्यावर ‘तू नवर्‍याबरोबर शारिरीक संबंध ठेवते, तसे माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेव’, असे म्हणून सासर्‍याने सूनेला जवळ ओढून अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police) सासर्‍यासह सूनेचा पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल (Pimpri Crime) केला आहे. हा प्रकार खेड तालुक्यातील कोयाळी गावात जून 2019 पासून 21 जुलै 2021 पर्यंत सुरु होता.

याप्रकरणी सुनेने आळंदी पोलिसांकडे (Alandi Police) फिर्याद दिली आहे. त्यांचे लग्न झाल्यानंतर तिचा पती माहेरून सोन्याच्या साखळीसाठी 1 लाख 10 हजार रुपये घेऊन येण्यास सांगत असतो. तसेच घरातील व शेतातील कामे नीट येत नाहीत, या कारणावरुन वेळोवेळी फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण करीत. फिर्यादी व सासू यांचे भांडण झाल्यावर फिर्यादी या तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे जाते असे म्हणल्यावर सासू व सासर्‍यांनी तिला घरात कोंडून ठेवले होते.

फिर्यादी व सासरे हे बुधवारी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी सासर्‍याने फिर्यादी
यांच्याजवळ येऊन तू तुझे नवर्‍याबरोबर शारिरीक संबंध (physical relation) ठेवते तसे
माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेव असे म्हणून त्यांना आपल्याजवळ ओढले. त्यांच्या मनास लज्जा
उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकारानंतर सुनेने पोलिसांकडे फिर्याद दिली असून आळंदी
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

Earthquake | बिकानेरमध्ये 24 तासात दुसर्‍यांदा भुकंपाचे झटके; पाकिस्तान होता केंद्रबिंदू, जीवितहानीचे अद्याप वृत्त नाही

Pune Crime | कोंढवा पोलिसांकडून पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या भाजपच्या माजी नगरसेवक विवेक यादवला गुजरात बॉर्डरवरून अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Crime | father in law want to maintain physical relation with daughter in law, FIR on three in alandi police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update