Pimpri Crime | सफाई कामगारांचे पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपनीच्या संचालकासह 15 जणांवर FIR, 7 जणांना अटक
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कंत्राटी कामगारांना त्यांचे पूर्ण वेतन न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरीमध्ये उघडकीस आला (Crime) आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation) कंत्राटी कामगारांना (contract workers) त्यांचे पूर्ण वेतन न दिल्याप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या संचालकांसह 15 जणांवर (director contractor company) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर 7 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार 16 डिसेंबर 2017 ते 24 जुलै 2021 या दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घडला आहे. याप्रकरणी पालिकेचे कामगार कल्याण अधिकारी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली (Crime) आहे.
संचालक हायगरीब एच गुरु (वय-60), सहसंचालक मीनाक्षी एच गुरु (वय-36 दोघे रा. भाईंदर (प) जि. ठाणे), अकाउंट फायनान्स चंदर जलधर मोहंती (वय-36), मार्केटिंग व रिक्रूटमेंट ऑफिसर प्रमोद उर्फ प्रमोदकुमार प्रफुल्ल बेहुरा (वय-39), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर कार्तिक सर्यमनी तराई (वय- 51 तिघे दोघे रा. यशोपुरम सोसायटी, लिंक रोड, चिंचवड), संभाजी पवार (वय-29 रा.तळवडे), सुपरवायझर नितीन गुंडोपण माडलगी (वय-46 रा. केशवनगर चिंचवड), विश्वनाथ विष्णु बराळ (वय-40 दोघे रा. यशोपुरम सोसायटी, लिंक रोड, चिंचवड), अक्षय चंद्रकांत देवळे (वय-26 रा. रुपीनगर निगडी), स्वप्नील गजानन काळे (वय-32 रा. रुपीनगर निगडी), नंदु ढोबळे (वय-35 रा. रुपीनगर, निगडी), चंदा अशोक मगर (वय-40 रा. राहुलनगर, निगडी), धनाजी खाडे (वय-40 रा. राहुल नगर, निगडी), ज्ञानेश्वर म्हांबरे (रा. 40 रा. चिखली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पालिकेचे कामगार कल्याण अधिकारी प्रमोद श्रीरंग जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी पिंपरी चिंचवड महापालिकेसोबत केलेल्या करारामधील अटींचे पालन केले नाही.
किमान वेतन कायदा (Minimum Wages Act) व इतर कायद्यानुसार सफाई कामगारांना त्यांचे पूर्ण वेतन (full wages) मिळणे आवश्यक आहे.
परंतु सफाई कामगारांना त्यांचे पूर्ण वेतन न देता ठेकेदार कंपनी संचालक आणि इतरांनी पालिकेची फसवणूक केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
याशिवाय स्वत:च्या आणि कंपनीच्या फायद्यासाठी सफाई कामगारांचा विश्वास संपादन करुन त्यांची बँकेच्या फॉर्मवर सही व अंगठा घेतला.
तसेच कामगारांना बँकेकडून मिळालेले एटीएम कार्ड धमकी देऊन बळजबरीने काढून घेतले.
तर काही कामगारांनी 13 हजार रुपये पगाराची मागणी केली असता त्या कामगारांना कामावरुन कमी केले.
आरोपींनी संगनमत करुन कामगारांचे बँक एटीएम व कागदपत्रे स्वत:जवळ असल्याचा फायदा प्रत्येक महिन्याला घेतला.
आरोपींनी प्रत्येक कामगारांच्या पगारातून चार हजार रुपये खंडणी उकळली.
कामगारांना प्रत्यक्षात मिळणारा पगार न देता त्यांना रोख स्वरुपात कमी वेतन देऊन कामगारांची फसवणूक केली.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींपैकी अकाउंट फायनान्स चंदर जलधर मोहंती (वय-36), मार्केटिंग व रिक्रूटमेंट ऑफिसर प्रमोद उर्फ प्रमोदकुमार प्रफुल्ल बेहुरा (वय-39), मार्केटिंग व फिल्ड ऑफिसर कार्तिक सर्यमनी तराई (वय- 51 तिघे दोघे रा. यशोपुरम सोसायटी, लिंक रोड, चिंचवड), सुपरवायझर नितीन गुंडोपण माडलगी (वय-46 रा. केशवनगर चिंचवड), विश्वनाथ विष्णु बराळ (वय-40 दोघे रा. यशोपुरम सोसायटी, लिंक रोड, चिंचवड), स्वप्नील गजानन काळे (वय-32 रा. रुपीनगर निगडी), चंदा अशोक मगर (वय-40 रा. राहुलनगर, निगडी), धनाजी खाडे (वय-40 रा. राहुलनगर, निगडी) यांना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ (Police Inspector (Crime) Bhojraj Misal) करीत आहेत.
Web Title :- Pimpri Crime | FIR against 15 persons, including the director of a company who did not pay full wages to the cleaners, 7 arrested
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Clubhouse यूजर्ससाठी वाईट बातमी ! डार्कवेबवर विकले जाताहेत 380 कोटी यूजर्सचे फोन नंबर !
Mann Ki Baat Today | ‘प्रत्येक नागरिकाने आज ‘भारत जोडो आंदोलना’चे नेतृत्व करावे’ – PM नरेंद्र मोदी