Pimpri Crime | महिला पोलीस आत्महत्या प्रकरणी 5 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime | पुणे पोलीस (Pune Police) दलात कार्यरत असणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने वाकड येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्यांनी तिचा छळ केला होता. सासरच्या छळाला कंटाळून महिलेने पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड (Pimpri Crime) मधील राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह सासरच्या पच जणांविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील (Pimpri Crime) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

श्रद्धा शिवाजीराव जायभाय Shraddha Shivajirao Jayabhay (वय -28 रा. कावेरीनगर पोलीस वसाहत वाकड) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात पती पवनकुमार बंकिम दहिफळे (वय-29), सासू सागरबाई बंकिम दहिफळे (वय-45) सासरे बंकिम बाबुराव दहिफळे (वय-52) दिर भगवान उर्फ पप्पू बंकिम दहिफळे (वय-24), आज्जे सासू मुक्ताबाई नामदेव वाघ (वय-65 सर्व रा. दैत्यनांदुरा, ता. पाथर्डी, जि. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयत श्रद्धा यांच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि पवनकुमार यांचा 2016 मध्ये विवाह झाला होता. श्रद्धा पुणे पोलीस दलात तर पवनकुमार भारतीय नौदलात (Indian Navy) कार्यरत होते. लग्नानंतर श्रद्धाच्या सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुला नांदवणार नाही. तुला घटस्फोट द्यावा लागेल. नाहीतर तुला व तुझ्या बाळाला जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली.

सासरच्या लोकांकडून वारंवार छळ होत होता.
या छळाला कंटाळून श्रद्धा यांनी 5 जुलै रोजी कावेरीनगर पोलीस वसाहत वाकड (Wakad police colony) येथे राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन वर्षाच्या मुलाली नातेवाईकांकडे ठेवले होते.
श्रद्धा या पुणे पोलीस दलाच्या विशेष शाखेत (special branch) नेमणुकीस होत्या.

Web Title :- Pimpri Crime | five persons have been booked connection suicide woman police officer wakad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Promotion to Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती, पुण्यातील 22 जणांचा समावेश; गृह विभागाने काढला अध्यादेश

Sunny Leone | सली लिओनी, रतन टाटांच्या नावानं मुंबईत फिरतेय गाडी; मुंबई पोलिसांकडून 17 जणांवर FIR