Pimpri Crime | इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेमवर सुरु होता जुगार ! भोसरी पोलिसांची तीन ठिकाणी कारवाई, सव्वा तीन लाखांचा माल जप्त

पिंपरी : Pimpri Crime | इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम आता लोकांच्या मोबाईलवरही असल्याने पार्लरमध्ये खेळायला जाणार्‍यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे आता त्याचा वापर जुगारासाठी होत असल्याचे समोर आले आहे. भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) तीन ठिकाणी छापे टाकून हा इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेमद्वारे मशीनवरील आकडे लावण्याचा जुगार सुरु असल्याचे उघडकीस आणले आहे. याप्रकरणी 30 मशीन जप्त केल्या असून 11 जणांवर गुन्हे (Pimpri Crime) दाखल केले आहेत. भोसरीतील केएसबी चौकाजवळील शाहूनगर येथील वैभव कॉम्प्लेक्समधील सत्यम मार्केट (Satyam Market) आणि मोशीतील (Moshi) ओमगुरुदत्त व्हिडिओ गेम येथे हा जुगार सुरु होता. तेथे एक रुपयाला 30 रुपये असा दर होता.

व्हिडिओ गेम पार्लर चालक अभिजित राजेंद्र सोळंके (वय 32, रा. काळेवाडी फाटा, वाकड), कामगार सुरेश महादु ठाकूर (वय 51, रा. कुदळवाडी), जुगार खेळणारा अमोल दिलीप वायकर (वय 29, रा. चिखली) तसेच व्हिडिओ गेम पार्लर मॅनेजर अजित संभाजी जाधव (वय 21, रा. मोहननगर, चिंचवड), कामगार आदेश बाळाजी जाधव (वय 20, रा. दत्तनगर, निगडी), जुगार खेळणारे नितीन ज्ञानोबा मोरे (वय 40, रा. चिखली), सागर विजय महापुरे (वय 35, रा. दत्तनगर, चिंचवड) आणि किरण विठ्ठल साळुंखे (वय 26, रा. मोहननगर, चिंचवड) तसेच बाळगोंडा पायगोंडा पाटील (वय 40, रा. मरकळ), दिनेश सूर्यभान भोळे (वय 27, रा. कुरुळी, ता़ खेड), श्रीनिवास चंद्रकांत त्रिबंके (वय 28, रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़.

शाहूनगरमधील सत्यम मार्केटमधील गाळा नंबर 5 व 6 येथे इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम मशीनवरील
आकड्यावर पैसे लावण्यास सांगून जिंकल्यास 1 रुपयाला 30 रुपये दिले जात होते. पोलिसांनी येथे
छापा घालून दोन्ही ठिकाणची 20 व्हिडिओ गेम मशीन व रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच मोशी येथील ओमगुरुदत्त व्हिडिओ गेम येथे व्हिडिओ गेम मशीनवर 1 रुपयाला 15 रुपये या
दराने जुगार चालविला जात होता.

हे देखील वाचा

Osmanabad Crime | महिला पोलीस अधिकाऱ्याला अपार्टमेंटमच्या गच्चीवरुन खाली दिले फेकून, पोलिस नाईकास 7 वर्षाचा कारवास

Atul Bhatkhalkar | ‘स्वत: ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यंत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Crime | Gambling begins with electronic video games! Bhosari police raided three places and seized goods worth Rs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update