Pimpri Crime | ‘गेम’ वाजवण्यासाठी हवं होतं पिस्टल, खरेदीसाठी फोडले एटीएम; असा अडकला गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime | परिसरात एकमेकांकडे पाहण्यातून झालेल्या वादातून मारहाण झाली होती. या रागातून मुलाचा गेम वाजवण्यासाठी पिस्टल (Pistol) खरेदीसाठी एटीएम (ATM) फोडण्याऱ्या तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने (Anti-robbery squad) अटक (Arrest) केली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेज तपासले. विशाल दत्तु कांबळे (वय-24 रा. संगमनगर, नॅशनल स्कुल गेट नं.20, रेल्वे लेन, जुनी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सोमवारी (दि.16) सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi police station) हद्दीतील अ‍ॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) एटीएमची तोडफोड करुन पैसे चोरण्याचा प्रयत्न झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने गुन्हा घडलेल्या परिसरातील 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती संगमनगर परिसरातील असल्याची माहिती पोलीस नाईक राजेश कौशल्ये यांना समजली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संगमनगर परिसरात आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी या परिसरात सांगवीतून येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर गस्त घातली. दरम्यान सीसीटीव्हीत आढळून आलेला व्यक्ती आहिल्यादेवी चौकाकडून साई चौककडे जात असल्याची माहिती कौशल्ये यांना समजली. त्यानुसार पोलिसांनी काही अंतर आरोपीचा पाठलाग केला.

 

असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

आरोपी सांगवी येथील एका हॉटेल समोर थांबल्यानंतर पोलीस नाईक राजेश यांनी दारु कोठे मिळेल अशी विचारणा त्याच्याकडे केली. त्यावेळी त्याने जवळच्या परिसरात दारु मिळत असल्याचे सांगितले. राजेश कौशल्ये यांनी त्याला सोबत दारु पिण्यास जाऊ असे सांगून त्याला ताब्यात घेतले.

 

पिस्तुलासाठी फोडले एटीम

आरोपी विशाल कांबळे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले,
मागील आठवड्यात सांगवी परिसरामध्ये ऐकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन एका मुलाने मारहाण केली होती. त्याचा राग मनामध्ये होता.
त्याचा बदला घेण्यासाठी मारहाण करणाऱ्या मुलाचा गेम वाजविण्यकरीता पिस्तुलाची आवश्यकता होती.
पिस्तुल खरेदीसाठी एटीएम फोडून पेसे मिळतील असा प्लॅन केला होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
आरोपीने गुन्ह्याची कबली दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri-Chinchwad CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ (DCP Sudhir Hiremath), सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर (ACP Prashant Amrutkar) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे (Senior Police Inspector Uttam Tangde), सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अमंलदार राजेश कौशल्ये, उमेश पुलगम, सागर शेडगे, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, प्रविण कांबळे, प्रविण माने, आशिष बनकर, नितीन लोखंडे, गणेश कोकणे व चिंतामण सुपे यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pimpri Crime | I wanted a pistol to play ‘games’, ATMs for shopping; He got caught in the trap of crime branch

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Udayanraje Bhosale | खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कोरोना पॉझिटिव्ह?, 4 दिवसांपासून पुण्यात सुरु आहेत उपचार

Raksha Bandhan 2021 | रक्षाबंधनच्या दिवशी 474 वर्षानंतर अद्भूत योग, गज केसरी योगमध्ये बांधली जाणार राखी

Devendra Fadnavis | ‘दारू दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का? (व्हिडीओ)