Pimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस चौकीत धमकी’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime | एकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत (police chowki) गेलेल्या पत्नीला समजावून सांगणाऱ्या पतीने चौकी बाहेर पत्नीचा गळा दाबला. पती-पत्नीची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या निगडी पोलिसांना (Nigdi) पतीने धक्काबुक्की करत चौकीत राडा घातला. तसेच बाहेर बडल्यावर सोडणार नाही, अशी धमकी (threat) पोलीस उपनिरीक्षकांना (Police Sub Inspector) देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला अटक (Accus arrest) केली आहे. ही घटना रविवारी (दि.1) रात्री दोनच्या सुमारास (Pimpri Crime) यमुनानगर पोलीस चौकीत (yamunanagar chowki) घडली.

सुरज असकर चौधरी (रा. स्वामी विवेकानंद शाळेसमोर, से.नं.22 इंदिरानगर, ओटास्किम, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यातील (Nigdi police station) पोलीस उपनिरीक्षक उत्तम बी ओमासे (Uttam B. Omase)यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज हा त्याच्या पत्नीसह विशाल प्रकाश पंडित याच्या विरोधत तक्रार देण्यासाठी यमुनानगर पोलीस चौकीत आला होता. विशाल पंडित विरोधात तक्रार का देत नाही म्हणून समजून सांगण्यासाठी आरोपीने पत्नीला बाहेर नेले. त्याठिकाणी त्याने पत्नीचा गळा दाबला. पत्नीने आरडाओरडा केल्याने आवाज ऐकून पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि मार्शल कर्मचारी बाहेर आले.

त्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या तावडीतून त्याच्या पत्नीची सोडवणूक करुन त्यांना चौकीत नेले. त्यावेळी सुरजने पोलीस उपनिरीक्षक ओमासे आणि पोलीस नाईक मुळे यांच्यासोबत झटापट करुन धक्काबुक्की केली. तसेच चौकीतील टेबलवर बसून खिडकीची काच फोडली.
फुटलेली काच हातात घेऊन स्वत:च्या गळ्यावर मारुन घेतली.
तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यास फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांना बाहेर आल्यावर सोडणार नाही, अशी धमकी दिली.
पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Web Title : pimpri crime | I will not leave when I come out, police sub-inspector threatened at police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
 

GST Restrictions Relaxations | करदात्यांना दिलासा ! जुलैमध्ये 1.16 लाख कोटी जीएसटी संकलन; करदात्यांना सीएच्या प्रमाणपत्राची गरज नाही?

Mulethi Face Pack | सैल त्वचा बनेल कसदार, फक्त एकदा ‘हा’ फेस पॅक लावा; सुरकुत्याच्या समस्येपासून मिळेल ‘आराम’

Android Phone | सावधान ! 27 सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमध्ये Gmail, YouTube आणि Google सुद्धा नाही चालणार

Shivsena | शिवसेनेची सामनातून भाजपवर टीका; ‘राज्यात भाजपचा ‘अंतकाळ’ जवळ आलाय’

Pune Rural Police | पुणे- सातारा महामार्गावर पट्टेरी वाघाची कातडी विक्री करणारी टोळी गजाआड