Pimpri Crime | कलयुग ! महिलेनं स्वतःच्याच अल्पवयीन मुलीला लावलं ‘धंद्या’ला, सेक्स रॅकेटसोबत गांजाची विक्री; महिलेसह अश्लील चाळे करणारे ‘गोत्यात’

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)  –  Pimpri Crime | पहिल्या पतीपासून झालेल्या आपल्या अल्पवयीन मुलीला आईने वेश्या व्यवसायाला (prostitution business) लावल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याचबरोबर महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेताना तेथे ग्राहकांना गांजाही दिला जात असल्याचे आढळून आले. पिंपरीतील मासुळकर कॉलनीमधील उद्यमनगर येथील एका फ्लॅटवर अंमली पदार्थ (Drugs) विरोधी पथकाने केलेल्या छाप्यात हा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक (Pimpri Crime) केली आहे.

अजय नारायण माने (वय २२, रा. उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी), ओंकार बाळासाहेब कदम (वय २२, रा. करावागज, ता. बारामती), राकेश रामजीलाल चौधरी ऊर्फ सहारान (वय ३२, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी) आणि मांगीराम सुरतसिंग बुगालिया (वय ३२, रा. निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले (Assistant Police Inspector Prashant Mahale) यांनी पिंपरी पोलिसांकडे (Pimpri Police) फिर्याद दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (anti narcotics cell) मासुळकर कॉलनीतील श्रेयस हाईटस (Shreyas Heights, Masulkar Colony, Pimpri) येथील एका फ्लॅटवर छापा टाकला.
त्यावेळी तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले.
हा वेश्या व्यवसाय चालविणार्‍या महिलेने आपल्या पहिल्या पतीपासून असलेल्या अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे दिसून आले.
तिच्या या फ्लॅटमध्ये 476 ग्रॅम गांजा व विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या.
तसेच राकेश चौधरी आणि मांगीराम बुगालिया हे दोघे पिडित महिलांशी अल्पवयीन
मुलीसमोर अश्लिल चाळे करीत असताना आढळून आले.
पोलिसांनी या महिलेसह पाच जणांना अटक केली आहे.

 

Web Title : Pimpri Crime | Kalyug ! The woman engaged her own minor daughter in prostitution, selling marijuana, anti narcotics cell of pimpri chinchwad arrested woman and other 4 peoples

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Suspected Death of Judge | हत्या की दुर्घटना ! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या न्यायाधीशांचा ऑटोच्या धडकेने मृत्यू, मंत्र्याच्या आदेशानंतर तपासासाठी विशेष पथक (व्हिडीओ)

Maharashtra Unlock | राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत आणि लोकलसंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ

Pune News | हवेली सह दुय्यम निबंधकांची वरिष्ठांकडून ‘पोलखोल’, तडकाफडकी निलंबित