Pimpri Crime | पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दोन टोळ्यांवर ‘मोक्का’ कारवाई

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर (Pimpri Chinchwad Crime) आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Acction) Mokka बडगा उचलला आहे. पोलिसांनी चिंचवड येथील सुरज उर्फ ससा वाघमारे आणि म्हाळुंगे येथील संतोष मांजरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई (Pimpri Crime) केली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokle) यांनी शुक्रवारी (दि.16) यासंदर्भातील आदेश दिले आहेत. pimpri crime | mcoca on two criminal gangs in pimpri chinchwad mahalunge area

चिंचवड येथील टोळी प्रमुख सुरज उर्फ ससा राजू वाघमारे (वय-24) स्वप्नील सिद्राम माडेकर (वय-23), राजा सिद्राम माडेकर (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे यासारखे 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या जोरावर ते परिसरात दहशत माजवत होते.
यामुळे त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे (Police Inspector Vishwajit Khule) यांनी दिली.

म्हाळुंगे येथील टोळीप्रमुख संतोष मधुकर मांजरे (वय-30 रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), आकाश उर्फ गणेश रवी उर्फ रवींद्र धर्माळे (वय-19), ऋषिकेश उर्फ गोट्या सुनील भालेराव (वय-20), गौरव गजानन मुळे (वय-20), अक्षय अशोक शिवळे (वय-25), दीपक बाळू पिंजन (वय-25), वैभव उर्फ सोन्या अरुण खोंडगे (वय-22 सर्व रा. म्हळुंगे, ता खेड), विनोद उर्फ सोन्या गणेश पवार (वय-19 रा. शेलू, ता. खेड), अभिषेक बुद्धसेन पांडे (वय-19 रा. खालुंब्रे), अनिल शांताराम शिंदे (वय-22 रा. आंबोली, ता. खेड), ऋषिकेश बाळू रोकडे (रा. भांबोली,ता. खेड), सौरभ सोनवणे (रा. बिड) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवई करण्यात आली आहे. या टोळीवर खून, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग, खंडणीसाठी दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे असे गंभीर 12 गुन्हे दाखल आहेत.

चिंचवड आणि म्हाळुंगे येथील गुन्हेगाराच्या टोळ्या परिरात दहशत पसरवत होत्या.
गुन्ह्यांच्या जोरावर स्वत:च्या आर्थिक फायदा करवून घेत होत्या.
यामुळे या दोन टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
या दोन्ही प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंजुरी देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई उपायुक्त सुधीर हिरेमठ (deputy commissioner of police sudhir hiremath) , उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे,
पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण यांनी ही कारवाई केली.

Web Title : pimpri crime | mcoca on two criminal gangs in pimpri chinchwad mahalunge area

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Viral Video | हुबेहुब आपल्या वडिलांसारखी गोलंदाजी करतो मुरलीधरनचा मुलगा, व्हिडिओ झाला व्हायरल 

Kolhapur Crime | धक्कादायक ! 9 वीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 5 वर्षे लैंगिक अत्याचार

Corona Vaccination | 18 वर्षांखालील देखील मुलांचं लसीकरण होणार; केंद्र सरकारची माहिती