Pimpri Crime | मोबाईल चार्जरच्या वादातून राहाटणीत तरुणाचा गोळीबार करून खून

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मोबाईलचा चार्जर (Mobile Charger) घेताना झालेल्या वादातून तरुणावर पिस्तुलातून गोळीबार (Firing) केल्याची घटना पिंपरीत (Pimpri Crime) घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.15) रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊच्या पिंपरी (Pimpri Crime) येथील राहाटणीतील (Rahatani) सुमारास एक्सपर्ट मोबाईल पॉईंट येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) एकावर खुनाचा आणि आर्म अॅक्टचा (Arm Act) गुन्हा दाखल करुन एकला ताब्यात घेण्यात आले आहे.

ओवेज इसाक इनामदार Owez Isaac Inamdar (वय-16 रा. सांडभोर पोल्ट्री फार्म शेजारी, विजयनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
किरण शिवाजी वासरे (रा. राहाटणी) याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ओवेज याचे वडील इसाक इस्माईल इनामदार (वय-40 रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहाटणीतील शिवाजीनगर येथे एक्सपर्ट नावाचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे.
याठिकाणी आरोपी किरण वासरे रविवारी मोबाईलचा चार्जर (Mobile charger) घेण्यासाठी दुकानात आला होता. त्यावेळी किरण याच्या जवळ बंदूक (Pistol) होती.
त्यावेळी मयत ओवेज याने बंदुक कशाला आणली तू येथून निघून जा नाहीतर मी तुझी तक्रार पोलिसांत करेन असे सांगितले.
यावरुन चिडलेल्या किरण वासरे याने ओवेज याला शिवीगाळ व दमदाटी करत किरण याने बंदुकीतून ओवेज याच्यावर गोळीबार केला.

यामध्ये गंभीर जखमी झाल्याने ओवेज याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी (Wakad Police) घटनास्थळी धाव घेतली.
आरोपी किरणला ताब्यात घेतले.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pimpri Crime | Murder by shooting a young man in the residence over a mobile charger dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 80 व्या वर्षी केला सिंहगड ‘पार’ (व्हिडीओ)

MNS | मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा; म्हणाले – ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू’

Health Tips | हात-पायातून उष्णता निघते का? जाणून घ्या कारण आणि उपाय