धक्कादायक ! सासऱ्याची सुनेशी ‘लगट’, वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केलं – पतीचं पत्नीला उत्तर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पती कामावर गेल्यावर कश्याचे तर कारण करुन सासरा लगट करीत असे. याची तक्रार पत्नीने पतीकडे केली असता पतीने धक्कादायक उत्तर दिले. ‘वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केले असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वाग’ असे सांगून, भांडण काढून पतीने पत्नीला माहेरी पाठवले आणि नंतर घटस्फोटाची नोटीस पाठवली. हा प्रकार चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. तर 40 वर्षीय पती आणि 65 वर्षीय सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे 2018 ते 16 सप्टेंबर 2018 या कालावधीत ही घटना चिखलीतील सानेवाडी परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपींनी आपसांत संगनमत करून माहेरहून पैसे आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी यांचे पती कामावर गेल्यानंतर घरात असलेले सासरे कशाचा तरी बहाणा करून फिर्यादी यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होते.

हे लक्षात आल्यानंतर महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. त्यावेळी पतिकडून धक्कादायक उत्तर मिळाले. ‘तुझ्याशी लग्न हे माझ्यासाठी केलेले नसून वडिलांसाठी केले आहे. त्यामुळे तू त्यांच्या इच्छेप्रमाणे वागत जा’, असे सांगितले आणि पत्नीसोबत भांडण केले. तसेच पत्नीला माहेरी पाठवून घटस्फोट मागणीची नोटीस पाठविली. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like