धक्कादायक ! पोटच्या 12 वर्षाच्या मुलीवर बापाकडून लैंगिक ‘अत्याचार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बाप-लेकीच्या नात्याला कलंक फासणारी घटना घडली आहे. पत्नी बाहेर गेली असताना नराधम पतीने स्वतःच्या १२ वर्षीय मुलीसोबत लेंगिक अत्याचार केले आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ३५ वर्षीय नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आईने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीची आई कामासाठी बाहेर गेली होती. त्या दरम्यान नराधम बापाने हे कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस करत आहेत.

You might also like