बहिणीशी फोनवर बोलतो म्हणून मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी, लांडेवाडी येथे बहिणीशी फोनवर बोलल्याच्या कारणावरून तरुणाला तिघांनी मिळून हॉकी स्टिकने मारहाण केली. उमेश फुलचंद यादव 24, रा. लांडेवाडी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुनील पुकार यादव (24), प्रदीप पुकार यादव (21), रमेश गोबरी यादव (40, सर्व रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उमेश हे आरोपी रमेश यादव याच्या बहिणीसोबत फोनवर बोलले असल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ केली. तसेच हॉकी स्टिकने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये उमेश यांच्या डोक्यावर, तोंडावर गंभीर दुखपात झाली. त्यानंतर आरोपींनी उमेश यांना पाहून घेण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.