पिंपरीत पतीने पत्नीला पेटवले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ भांडणातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नवलाख उंब्रे येथे घडली आहे.

स्वप्नील शिवानंद कांबळे (22, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा आरोपी पती यांच्यामध्ये किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी पतीने फिर्यादी यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.