पिंपरीत हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. यामध्ये दोघांनी मिळून एकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजता वाकड ब्रिजजवळ घडली.

अविनाश रामराव नाईकोडी (21, रा. हिंजवडी), किरण शंकर जांभळे (32, रा. साखरेवस्ती, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाबासाहेब पंडितराव हारबडे (29, रा. शितळादेवी नगर, म्हाळुंगे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी सोमवारी रात्री वाकड ब्रिजजवळ जगदंब हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. तिथे आरोपी यांनी फिर्यादी यांना ‘आज किती पैसे कमावले, फुकट जेवायला आला’ असे म्हणून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर दारूसारखे मादक पेय पिऊन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like