किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एकाला मारहाण करत दुचाकीची तोडफोड करत नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री आठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडित जैस्वाल, दीपक जैस्वाल, राजकुमार जैस्वाल उर्फ लालू, रणजित जैस्वाल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुनील नारायण जाधव (42, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे गुरुवारी दुपारी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली ‘तुला जास्त मस्ती आले आहे का, तुझी मस्ती जिरवतो’ असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड करत एक हजार 500 रुपयांचे नुकसान केले. तपास निगडी पोलीस करीत आहेत.