पिंपरी : महिला पोलिसावर घरात घुसून प्राणघातक हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीला माहेरी पाठवण्यास भाग पाडल्याचा राग मनात धरुन घरात घुसून पत्नीच्या पोलीस बहिणीवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. ही घटना गुरुवारी कृष्णानगर रेल्वे पोलीस वसाहती मध्ये घडली आहे.

सिंधु मोहीते या रेल्वे पोलीस महिलेवर त्यांच्या मोठ्या बहिणीच्या पतीने तीन वार केले असून त्यांची तब्येत ठीक आहे. विनोद हिरामण चव्हाण (३५, येलवाडी देहूगांव) याने हल्ला केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या बहिणीला तिचा पती वारंवार मारहाण करीत होता म्हणून तिने मोठ्या बहिनीला माहेरी पाठविले होते. त्यामुळे चिडून जाऊन मारहाण केली आहे.

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.पुढील तपास पोलीस करत आहेत.