पिंपरी : भांडणे दोघांची पेटवली तिसर्‍याचीच गाडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या हॉटेल बंद असले तरी पार्सल सेवा सुरु आहेत. ही पार्सल पोहचविणार्‍या डिलिव्हरी बॉयचे एकाशी अपघातावरुन भांडणे झाली. या भांडणाच्या रागातून त्याने दुसर्‍याच डिलिव्हरी बॉयची मोटारसायकल पेट्रोल टाकून जाळली.

ही घटना हिंजवडीमधील देशी ढाबा हॉटेलजवळ १८ मे रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडली. याप्रकरणी माधव पंडित गायकवाड (वय २६, रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. माधव गायकवाड हे झोमॅटो डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतात. एका डिलिव्हरी बॉयचे दुसर्‍याबरोबर अपघाताच्या कारणावरुन भांडणे झाली होती. भांडणाच्या कारणावरुन या डिलिव्हरी बॉयच्या मनात राग होता. त्याने त्या डिलिव्हरी बॉयची मोटारसायकल समजून माधव गायकवाड यांच्या मोटारसायकलवर पेट्रोल टाकून ती जाळून गाडीचे नुकसान केले. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.