देशी दारूच्या दुकानात तोडफोड ; मोबाईल फोन, दारूच्या बाटल्या चोरीला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – देशी दारूच्या दुकानात आरडाओरडा करणाऱ्यास हटकले म्हणून दुकानदाराला तिघांनी मारहाण केली. दुकानातील टीव्ही व कॅमेरे फोडून मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना आकुर्डी भाजी मंडई जवळील देशी दारू दुकानात घडली.

या प्रकरणी प्रदीप लक्ष्मणराव खिरडे (२७, रा. निगडी, प्राधिकरण) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप यांचे आकुर्डी भाजी मंडईजवळ सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. बुधवारी दुपारी प्रदीप त्यांच्या दुकानात असताना आरोपी तीनजण दारू पिण्यासाठी आले. दारू पिताना ते गोंधळ घालत होते. त्यामुळे प्रदीप यांनी त्यांना आरडाओरडा करू नका असे सांगितले. त्यावरून तिघांनी मिळून दुकानातील टीव्ही आणि कॅमेरे फोडून टाकले.

प्रदीप यांच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून कोयत्याने वार केले. तसेच कोयत्याचा धाक दाखवून दुकानातून दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. तपास निगडी पोलीस करीत आहेत.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय

Loading...
You might also like