भजी खाल्याचे पैसे मागितल्याने स्टॉलचालकावर खुनी हल्ला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भजी खाल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने राग मनात धरुन चौघांनी नाश्ता सेंटरच्या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्यावर खुनी हल्ला केला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आशुतोष काटे, आतु शेख, महेश जगताप, सलीम पापा शेख (रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महेश जगताप याला अटक केली आहे.

याप्रकरणी राहुल प्रल्हाद झेंडे (वय ३६, रा. अशोका अपार्टमेंट, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथील झेंडे यांच्या घरी बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

आपली दादागिरी दाखविण्यासाठी गल्ली बोळातील गुंड हे जे कष्ट करुन स्वत:चा उदरनिर्वाह करत असतात, अशा गरीबांना मारहाण करुन आपली दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुणे, पिंपरी चिंचवडसह सर्वत्र दिसून येत आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, राहुल झेंडे यांचे नाश्त्याचे सेंटर आहे. बुधवारी त्यांच्या सेंटरवर हे चौघे जण आले. त्यांनी भजी खाल्ली व पैसे न देता तसेच परत जात होते. तेव्हा राहुल यांनी त्यांना पैसे मागितले होते. त्याच्या रागातून बुधवारी रात्री त्यांच्या घरी गेले व त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन लोखंडी कोयत्याने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना थांबविण्यासाठी गेलेल्या मौलाना शेख यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन लोखंडी कोयत्याने वार करुन जखमी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like