Pimpri Crime News | ‘प्रेयसीचा खून करून मृतदेह दिला जंगलात फेकून, तब्बल 10 वर्षानंतर घटनेचा झाला उलघडा

पिंपरी चिचंवड न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Crime News । मागील तब्बल 10 वर्षांपूर्वी केलेल्या खुनाचा (Murder) छडा पोलिसांना आता लागला आहे. ‘तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता दररोज रात्री मी दचकून उठायचो. गेल्या 10 वर्षात मला एकदा देखील नीट झोप लागली नाही. 10 वर्षांपूर्वी प्रेयसीचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यांनंतर याबाबत त्या आरोपीने पोलिसांना ही कबुली दिली आहे. किशोर लक्ष्मण घारे (रा. डोणे, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, चांदणी सत्यवान लांडगे (वय, 22, रा. बलदेवनगर, पिंपरी) अशी हत्या झालेल्या मुलीचं नाव आहे. pimpri crime news | after 10 years murder case solve

अधिक माहितीनुसार, ‘आरोपी किशोर (Kishor) आणि मृत चांदणी (Chandani) यांचे प्रेमसंबंध होते. चांदणीची गर्भधारणा झाल्याने तिने किशोरकडे विवाहासाठी तगादा लावला.
म्हणून संतापलेल्या आरोपी किशोरने विवाहाच्या बहाण्याने नेऊन चांदणीची हत्या (Murder) केली. आणि जंगलात टाकून दिला.
असं पिंपरी चिचंवडचे (Pimpri Chinchwad) पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश (Commissioner of Police Krishnaprakash) यांनी माहिती दिली आहे.
याच्यानंतर 10 वर्षांनी वाकड पोलिसांना (Wakad Police Station) चांदणीचा खून (Murder) झाल्याची कुणकुण लागली.

दरम्यान, वाकड पोलीस ठाण्याचे (Wakad Police Station) पोलीस निरीक्षक संतोषराव पाटील (PI Santoshrao Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली काही मिसिंग केसचा आढावा घेण्यात आला.
त्यावेळी चांदणी लांडगे मिसिंग केस शंकास्पद वाटली.
त्यांनी काही खबऱ्यांना याबाबत माहिती काढण्याचे काम दिले.
काही दिवसातच किशोर सध्या कुठे भाजी विकतो याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावरून पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान किशोरने सर्व घटनेची कबुली दिली.
चांदणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून ती गरोदर राहिली. ती विवाहासाठी मागे लागली असता.
त्यातून तिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह मावळ परिसरात जंगलात फेकून दिला अशी कबुली किशोरने दिली आहे.
तसेच, खून केल्यानंतर त्याला झोप येत नव्हती वारंवार चांदणीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.
तर, तो दररोज झोपेतून कधी कधी दचकून उठत होता.

काय आहे प्रकरण?

पिंपरी येथील बलदेवनगरमधील (Baldev Nagar) चांदणी लांडगे ही तरुणी 2011 रोजी घरातून निघून गेली होती. आरोपी प्रियकर किशोर घारे याच्यासोबत ती बेपत्ता झाली होती.
दोघेही लग्न करून पळून गेले असतील असा अंदाज घरच्यांना होता.
तर, चांदणीच्या आईने चांदणीच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क साधला होता.
मात्र, प्रत्येक वेळा किशोरच फोन उचलत होता.
यावरून चांदणीच्या आईने पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देखील दिली होती.
दरम्यान, दोघे बेपत्ता असल्याने दोघे विवाह करून कुठंतरी राहत असतील असा अंदाज व्यक्त करून पोलिसांनी हे प्रकरण तसेच ठेवले होते.
मात्र, तब्बल दहा वर्षांनी याचा उलघडा झाला आहे.

या तपासासाठी पिंपरी चिचंवडचे पोलिस आयुक्‍त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishnaprakash), अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale), उपायुक्‍त आनंद भोईटे (Deputy Commissioner of Police Anand Bhoite), सहायक आयुक्‍त श्रीकांत डिसले (Assistant Commissioner of Police Shrikant Disley) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सुनील टोणपे, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, अनिल लोहार, कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, राजेंद्र काळे, दीपक भोसले, वंदू गिरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, सागर कोतवाल इत्यादी पोलिसांनी कामगिरी केली आहे.

Web Title : pimpri crime news | after 10 years murder case solve

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

फक्त आधार क्रमांकाचा वापर करून ATM मधून धान्य मिळवता येणार !

Pune Police News | वारजे माळवाडी पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्यांना अटक

SSC Result 2021 | दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार !