Pimpri Crime News | दांडिया खेळताना वाद, अल्पवयीन मुलासह दोघांवर कोयत्याने वार; पिंपरी-चिंचवडमधील घटना, 4 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News | दांडिया खेळत असताना दांडि पुढच्याला लागली असता त्याने दांडिया निट खेळण्यास सांगितले. याचा राग मनात धरुन पाच जणांच्या टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला स्टीलच्या पाईपने तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या भावाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.23) रात्री साडेदहाच्या सुमारास पिंपरी पोस्ट ऑफिसजवळ खराळवाडी येथे घडली. याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. (Pimpri Crime News)

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने मंगळवारी (दि.24) पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष थोरात (वय 21), आकाश थोरात (वय 22),आदित्य मंगळवेडेकर (वय 21), नितीन शिंगाडे (वय 40 सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांना अटक केली असून त्यांचा साथीदार क्रिश शिंगाडे (वय-21) हा पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 307,323, 143,147,148,149 सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडिया खेळत असताना आरोपी संतोष थोरात याची दांडियाची दांडी फिर्यादी अल्पवयीन मुलाला लागली. त्यावेळी त्याने दांडिया निट खेळ असे म्हटले. याचा राग मनात धरुन संतोष याने त्याच्या इतर साथीदारांना घेऊन आला. आरोपींनी अल्पवयीन मुलाला खाली पाडून हाताने व लाथांनी बेदम मारहाण केली. तर नितीन शिंगाडे याने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात स्टीलचा पाईप मारुन जखमी केले.

भांडण सुरु असताना अल्पवयीन मुलाचा मावस भाऊ रोहित विजय जाधव हा भांडण सोडवण्यासाठी आला असता
तू आमच्यात का येतो, तुला ठार मारतो असे म्हणून तिघांनी डोक्यात कोयत्याने वार केले.
तसेच स्टीलच्या पाईपने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | निलेश राणेंच्या नाराजीचं खरं कारण आलं समोर, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत तोडगा

Pune Crime News | व्यवसाय होत नसल्याच्या रागातून लॅबची तोडफोड करून एकाला मारहाण, कोंढव्यातील घटना; तिघांना अटक