Pimpri Crime News | पुरातन काळातील मौल्यवान नाण्याची विक्री करत फसवणूकीचा प्रयत्न, 9 जणांची टोळी गजाआड

पिंपरी (Pimpri Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – पुरातन काळातील धातूचे नाणे (Coin of antiquity) विकून फसवणूक (Cheating) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 9 जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांनी गुरुवारी (दि.10) दुपारी एकच्या सुमारास आकुर्डी येथील गणेश व्हीजन (Ganesh Vision Akurdi) समोरील खंडोबामाळ ते चिंचवड (Pimpri Crime News) कडे जाणाऱ्या रस्त्यावर केली. या कारवाईत पोलिसांनी 16 लाख 69 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या

इम्रान हसन खान (वय-43 रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई), किशोर ज्ञानेश्वर भगत
(वय-36 रा. डोंबवली), रत्नाकर विजय सावंत (वय-43 रा. गोपाळनगर तीसगाव नाका, मुंबई), ज्योतीराम भिमराव पवार (वय-44 रा. समतानगर, 11 शाळेसमोर, उस्मानाबाद),
हरीष परशुराम पाटील (वय-68 रा. मातोश्री अपर्टमेंट, जठवाडा रोड, औरंगाबाद), संजय अर्जून कुचेकर (वय-42 रा. बिडीकामगार चौक, चंदननगर, खराडी, पुणे),
सुजित राजेंद्र सारफळे (वय-21 रा. तेरणा इजि. कॉलेज, तुळजापूर रोड, उस्मानाबाद), प्रमोद रामचंद्र बचाटे (वय-40 रा. उब्रेकोटे देवीमंदीर जवळ,
उस्मानाबाद), राजेश विजयकुमार गोवर्धन (वय-41 रा. ताम्हरी विभाग उस्मानाबाद)
असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक कंठय्या स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.

शाम्पूने नाही तर घरगुती गोष्टींने केस धुवा; ‘हे’ डोक्यातील कोंडा दूर करेल

होमगार्डला फसवण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करुन होमगार्ड वैभव तावरे यांना पुरातन काळातील धातूचे नाणे, लिबो कॉईन ज्यामध्ये हाय इरिडियम नावाचे केमिकल आहे.
यामुळे या नाण्याला बाजारात 10 कोटी रुपये किंमत असल्याचे सांगितले.
आरोपींनी होमगार्ड तावरे यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांना हे नाणे विकण्याचा प्रयत्न केला.

स्कोडा कारसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुरातन काळातील नाणे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश व्हीजन येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून पुरातन काळातील नाणे (लिबो कॉईन), 7 लाख रुपये रोख, 1 लाख 19 हजार 500 रुपये किमतीचे 9 मोबाइल, 8 लाख 50 हजार रुपये किमतीच्या दोन कार यामध्ये एक वॅगनार
(एमएच 05 ईक्यु 0685) आणि एक स्कोडा कार
असा एकूण 16 लाख 69 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गर्भधारणेत मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ‘या’ पध्दतीनं वजन कमी करावे; जाणून घ्या

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड,
पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आर.बी. बांबळे, पोलीस हवालदार सतिश ढोले,
किशोर पढेर, विक्रम जगदाळे, आनंद साळवी, पोलीस नाईक शंकर बांगर, विलास केकाण, विनोद व्होनमाने, विजय बोडके, रमेश मावसकर, भुपेंद्र चौधरी,
कंठय्या स्वामी, सोमनाथ दिवटे, रुपेश गेंगजे, पोलीस शिपाई दिपक जाधवर,
अमोल साळुंखे, उमेश मोहीते, तुषार गेंगजे, होमगार्ड वैभव तावरे, ऋषिकेश पाटील यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

10 लक्षणांवरून जाणून घ्या मुलांना कोरोना झाला किंवा होणार आहे, लक्षणे समजताच ताबडतोब करा ‘ही’ 5 कामे

 

उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !

 

Weather Alert ! पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या

Pune Crime News | वाईन शॉपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्यानं 12 लाखाची फसवणूक; मुलगा शुभम शहा अन् बाप नंदेश्वर शहाला पोलिसांकडून अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Crime News | Attempted fraud by selling antique coins, 9 gangs go missing