Pimpri Crime News | कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी चंदन ठाकरेला मुंबईहून अटक; बॉलीवूडमधील गुंड नेत्यांची खंडणीखोरी उघड, 5 जणांवर वाकड पोलीस ठाण्यात FIR

पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मराठमोळा कला दिग्दर्शक राजेश साप्ते (Marathi Art Director Raju Sapte) यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ (Video) शेअर करीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) पाच जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला असून बिझनेस पार्टनरला मुंबईतून (Mumbai) अटक केली आहे. (Chandan Thackeray Business partner of marathi art director arrested from Mumbai in Raju Sapte suicide case; Ransom of goon leaders in Bollywood revealed, 5 arrested in Wakad police station)

Job | दहावी उत्तीर्ण झालेल्यांना रक्षा मंत्रालयात नोकरीची संधी; जाणून घ्या

चंदन रामकृष्ण ठाकरे Chandan Ramakrishna Thackeray (वय 36, रा. जीवनज्योती सोसायटी, कांदिवली वेस्ट, मुंबई Jeevanjyoti Society, Kandivali West, Mumbai) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तसेच नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) Naresh Vishwakarma (Mistry), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई) Gangeshwar Srivastava (Sanjubhai), राकेश मौर्य Rakesh Maurya, अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) Ashok Dubey (all from Mumbai)
अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली राजेश साप्ते Sonali Rajesh Sapte (वय 45, रा. चारकोप, कांदिवली वेस्ट, मुंबई Charkop, Kandivali West, Mumbai) यांनी वाकड पोलिसांकडे (Wakad Police) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या सर्वांवर 120 (ब), 384, 385, 386, 387, 306, 406, 420, 506, 34 अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Petrol Price in Pune Today | पेट्रोल डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर

साप्ते कुटुंबिय (Sapte family) हे मुंबईस (Mumbai) वातव्याला रहायला आहे. त्यांचे ताथवडे येथील अशोकनगरमधील (Tathawade, Ashoknagar) द नुक सोसायटीत (The Nook Society) फ्लॅट आहे. राजेश साप्ते (Rajesh Sapte) हे शुक्रवारी एकटेच पुण्यात आले. त्यांनी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयतन केला. पण तो होऊ शकला नाही.

‘रामनामा’वर देशभर डंका गाजविलेल्या ‘भाजप’ने अखेर ‘अयोध्ये’त प्रथमच फुलवले ‘कमळ’ !

Chandan Thackeray Business partner of marathi art director arrested from Mumbai in Raju Sapte suicide case; Ransom of goon leaders in Bollywood revealed, 5 arrested in Wakad police station

त्यानंतर त्यांच्या पत्नीने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला (Pimpri Chinchwad Police Control Room) फोन करुन याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतली. तेव्हा साप्ते यांनी घरात गळफास घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले, परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे सांगितले. आरोपी नरेश विश्वकर्मा, गंगेश्वर श्रीवास्तव, राकेश मौर्य व अशोक दुबे (The accused are Naresh Vishwakarma, Gangeshwar Srivastava, Rakesh Maurya and Ashok Dubey) यांनी कट करुन राजेश साप्ते (Rajesh Sapte) यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला ईडीचे समन्स; 2 दिवस होणार चौकशी

तसेच कामगारांना कामावर येऊ देणार नाही. तसेच व्यावसायिक नुकसान करण्याच्या धमक्या देऊन वारंवार जबरदस्तीने १० लाख रुपयांची मागणी केली. तसेच प्रत्येक प्रोजेक्टमध्ये 1 लाख रुपयांची पैशांची मागणी केली. त्यापोटी त्यांनी 2.5 लाख रुपये जबरदस्तीने देण्यास भाग पाडले. तसेच त्यांचा बिझनेस पार्टनर चंदन ठाकरे (Business partner Chandan Thackeray) याने वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करुन आर्थिक नुकसान केले आहे.

Bhiwandi Crime News | आरोपीच्या मृत्युनंतर जमावाची पोलिसांना बेदम मारहाण; भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील व्हिडिओ व्हायरल (Video)

या पाच जणांच्या जाचास कंटाळून राजेश साप्ते Rajesh Sapte (वय 51) यांनी ताथवडे (Tathawade) येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलिसांनी (Wakad Police) चंदन ठाकरे (Chandan Thackeray) याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक लोहार (Assistant Police Inspector Blacksmith) अधिक तपास करीत आहेत.

Vasai Virar MNC Recruitment-2021 | वसई विरार महापालिकेत कायदे तज्ज्ञांची पदभरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

इतके दिवस एमआयडीसीमध्ये कामगार संघटनांच्या नेत्यांच्या धमक्यांमुळे छोटे उद्योजक त्रस्त
झाल्याचे दिसून येत होते. माथाडी कामगारांच्या नावाखाली अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक या क्षेत्रात
शिरुन उद्योजकांना त्रास देत असल्याचे आढळून आले. हीच परिस्थिती बॉलिवूडमध्ये असल्याचे या
घटनेवरुन उघड झाले आहे. तेथील नेते कामगार संघटनांच्या नावाखाली खंडणी वसुली करीत
असल्याचे दिसून आले आहे.


ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pimpri Crime News | Chandan Thackeray Business partner of marathi art director arrested from Mumbai in Raju Sapte suicide case; Ransom of goon leaders in Bollywood revealed, 5 arrested in Wakad police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update