Pimpri Crime News | पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News | जुन्या वादाच्या कारणावरुन चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने (Koyata) वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी जीव वाचवण्यासाठी पळालेल्या तरुणाचा पाठलाग करुन आज तुला सोडत नसतो अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील श्रीनगर येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. (Pimpri Crime News)

याबाबत आकाश सोमनाथ गोडेपाटील (वय-27 रा. श्रीनगर, रहाटणी) याने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून आदित्य अहिरराव (रा. तापकीरनगर, काळेवाडी), प्रेम तरडे, प्रतिक माने (रा. श्रीनगर, थेरगाव) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या साथीदारावर आयपीसी 308, 323, 506, 34 सह आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि आदित्य यांच्यात पूर्वी बाचाबाची झाली होती.
याचा राग आरोपीच्या मनात होता. मंगळवारी रात्री आरोपींनी संगनमत करुन आकाश याला रहाटणी येथील ग्रेट
पंजाब हॉटेलजवळ गाठले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आरोपी प्रतिक माने याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने वार केला.
त्यानंतर इतरांनी कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्यादी यांनी कोयत्याचा वार चुकवून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळून गेले. नंतर चार जणांनी आकाश याचा पाठलाग केला. आज तुला सोडत नसतो, अशी धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी