Pimpri Crime News | पिंपरी : रिक्षाचालकावर कोयत्याने वार, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News | जुन्या वादातून शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका रिक्षाचालकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). ही घटना शुक्रवारी (दि.18) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तळवडे चौकात घडली आहे. याप्रकरणी दोन भावांना देहुरोड पोलिसांनी (Dehu Raod Police) अटक केली आहे.(Pimpri Crime News)

याबाबत चंद्रशेखर रावसाहेब सुकळे (वय-23 रा. शरदनगर, त्रिवेणीनगर, निगडी) याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विशाल अभिमन्यु जाधव (वय-19), अभिषेक बाबु जाधव (वय-19 दोघे रा. भिमनगर, तळवडे) यांच्यावर आयपीसी 326, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची रिक्षा घेऊन भाडे घेण्यासाठी टॉवर लाईन येथे गेले होते.
त्यावेळी आरोपी विशाल जाधव त्याठिकाणी आला.
त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत अंगावरील कपडे फाडले.
याबाबत फिर्यादी व त्यांचा भाऊ जाब विचारण्यासाठी तळवडे चौकात गेले.
त्यांनी विशाल जाधव याला जाब विचारला असता त्याने लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्याच्या मागिल बाजूस मानेवर वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर विशालचा भाऊ अभिषेक याने हाताने मारहाण करुन शिवीगाळ करत धमकी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खणसे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Lok Sabha Election 2024 | पंकजा मुंडेंना बीडमध्ये तगडं आव्हान, शरद पवार देणार ज्योती मेटेंना उमेदवारी?

Katraj Kondhwa Road | अखेर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये निधी दिला; रस्त्याच्या कामाला गती मिळणार