Pimpri Crime News | पिंपरी : तरुणाला मारहाण करुन लुटणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime News | शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तरुणाला मारहाण करुन लुटले. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील पवनेश्वर ब्रिजजवळ घडला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. (Pimpri Crime News)

याबाबत प्रतीक भारत गुंड (वय-21 रा. गवळीमाथा, टेल्कोरोड, भोसरी) याने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी ओंकार संजय शिंदे (वय-23 रा. दत्तनगर, चिंचवड), ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय-24 रा. दत्तनगर, चिंचवड) याच्यावर आयपीसी 394, 341, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत काळेवाडी येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरुन जात होते. पवनेश्वर ब्रिजजवळील वाघीरे चहाजवळ आले असता पाठिमागून बुलेटवरुन दोन अनोळखी तरुण फिर्यादी यांच्याजवळ आले. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीला त्यांची गाडी आडवी घालून आडवले. त्यांनी आमच्याकडे का बघताय असे म्हणून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच जबरदस्तीने दहा हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. फिर्यादी यांनी वाकड पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी