Pimpri Crime | ‘तुला माझ्याबरोबर एक रात्र यावे लागेल’ ! भोसरी पोलिस ठाण्याच्या आवारातच महिलेकडे शरीर सुखाची मागणी

पिंपरी : Pimpri Crime | भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) इमारतीत एका कंपनीच्या संचालकाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी (physical relation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका 50 वर्षाच्या व्यक्तीविरूध्द गुन्हा (Pimpri Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेचे पती पूर्वी एका 50 वर्षाच्या व्यक्तीच्या कंपनीत कामाला होते. नोकरीवरुन त्यांच्यात वाद सुरु आहे. हा प्रकार भोसरी पोलीस (Bhosari Police) ठाण्याच्या आवारात 6 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला. फिर्यादी व त्यांचा मुलगा भोसरी पोलीस ठाण्याच्या इमारतीमध्ये प्रवेश करीत होते. त्यावेळी त्या व्यक्तीनं फिर्यादी यांना थांबवून जरा तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले.

ते फिर्यादी यांना म्हणाले की, तू मला फार वर्षांपासून आवडतेस. आमचे कंपनीशी चाललेले तुझ्या
नवर्‍याचे जे भांडण आहे. ते मी मिटवून देऊ शकतो. पण तुला माझ्याबरोबर एक रात्र यावे लागेल.
तसेच तुझ्यात मला खूप रुची आहे. तुझ्या नवर्‍यात काय ठेवले आहे. माझ्याकडे खूप पैसा आहे.
त्याला सोडून तू माझ्याशी संबंध ठेव. हे जर तू केले नाही तर तुम्हाला दोघांनाही तुला आणि तुझ्या
नवर्‍याला मी संपवून टाकेन, अशी धमकी त्या व्यक्तीनं दिली. या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेल्या
होत्या. त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन हा प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

NCPCR Study | 10 वर्षाची 37.8 % मुले Facebook वर ‘अ‍ॅक्टीव्ह’, 24.3 % मुलांचे Instagram वर अकाऊंट

Corona virus Delta-3 Variant | कोरोना व्हायरसच्या नवीन म्यूटेशनमुळे जगभरात चिंता, डेल्टा-3 व्हेरिएंटबाबत भारतात सुद्धा अलर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pimpri crime one person demand physical relation towards woman in bhosari police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update