Pimpri Crime | रस्ता क्रॉस करताना ‘बेन्झ’ बसच्या धडकेत एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pimpri Crime | रस्ता क्रॅस करत असताना एका पादचारी व्यक्तीला भारत बेन्झ कंपनीच्या (Bharat Benz Company) बसची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या 48 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा अपघात (Accident) बुधवारी (दि.1) सकाळी 7 च्या सुमारास मोशी प्राधिकरणातील (moshi pradhikaran) स्पाईन रोडवर (Spine Road) झाला. याप्रकरणी बस चालकावर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) गुन्हा (Pimpri Crime) दाखल करण्यात आला आहे.

बाबु बसराज कोन्तल (वय-48 रा. से.नं. 16, जाधव वाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे
नाव आहे. तर केशव पांडुरंग पावडे (रा. पद्मावती रोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बाबु यांचे भेऊ हनुमंता बसराज कोन्तल (वय-39 रा. मोरवाडी कोर्टाच्या मागे, लाल टोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबु हे बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाले होते.
रस्ता क्रॉस करत असताना क्रांती चौकाकडून स्पाईन सिटी (Spine City) चौकाच्या दिशेने भरधाव
वेगात जाणाऱ्या भारत बेन्झ कंपनीच्या बसची (एमएच 14 डी डब्ल्यु 4593) धडक बाबु यांना बसली.
यामध्ये बाबु हे गंभीर जखमी होऊ त्यांचा मृत्यू झाला.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pimpri Crime | pimpri-chinchwad one died spot bus collision while crossing road incidents pimpri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

National Nutrition Week 2021 | ‘या’ 8 गोष्टींमध्ये सर्वात जास्त पोषकतत्व, तुम्ही देखील खाण्यास सुरूवात करा; जाणून घ्या

UGC NET Exam Dates | NTA ने बदलली यूजीसी नेट परीक्षेची तारीख, जाणून घ्या नवीन शेड्यूल

Pune Crime Branch Police | पत्नीला भेटायला पुण्यात आला अन् गुन्हे शाखेच्या जाळ्यात आडकला, सराईत वाहन चोराकडून 18 दुचाकी जप्त