Pimpri Crime | भर रस्त्यात रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करत होते तोतया पोलिस, पुढं झालं असं काही…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime | खाकी शर्ट, पँट आणि ब्राऊन बुट घालून रस्त्यावर उभे राहून येणार्‍या जाणार्‍या रिक्षाचालकांकडून ‘वसुली’ करणार्‍या दोघा तोतया पोलिसांना (Pimpri Crime) पकडले आहे. मच्छिंद्र पांडुरंग ओबांडे (वय ३५, रा. आगरकरवाडी, चाकण) आणि चंद्रकांत वामन कांबळे (वय ३६, रा. एकतानगर, चाकण) अशी त्यांची नावे आहेत.

या प्रकरणी चाकण विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस नाईक मच्छिंद्र पोपट भांबरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) फिर्याद दिली आहे. आळंदी चाकण रोडवर (Alandi-Chakan Raod) फिर्यादी व त्यांचे सहकारी हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास गेले होते. त्यावेळी चर्‍होली फाटा येथून आळंदी मार्गे चाकणला जात असताना आळंदी चाकण घाटाच्यावर रस्त्याच्या कडेला हे दोघे जण सरकारी गणवेश घालून पोलीस नसताना पोलीस असल्याची बतावणी करुन येणार्‍या जाणार्‍या रिक्षांना थांबवून त्यांची कागदपत्रे तपासणी करुन तुमच्यावर कारवाई करतो असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन पैसे घेत होते.

रिक्षाचालकही त्यांना पोलीस असल्याचे समजून हप्ता देत होते.
कारवाईहून परत येत असलेल्या पोलिसांना यांचा संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर दोघेही तोतया पोलीस असल्याचे आढळून आले.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title : Pimpri Crime | pimpri police arrest two fake police who collecting money

Real Estate in Pune | पुण्यात रियल इस्टेटला येणार सुगीचे दिवस; झानडू रियल्टीची प्रतिष्ठित नाईकनवरे डेव्हलपर्सशी भागीदारी

Weight Lose Tips | डायटिंग अन् उपवास नव्हे तर हे केल्यानं वेगानं कमी होईल वजन, जाणून घ्या

Rajsthan | भाजपा नेत्यावर हल्ला, शेतकरी आंदोलनकर्त्यांनी केली मारहाण, कपडे फाडले (व्हिडीओ)

Protein Week 2021 | शरीरात दिसत असतील ‘ही’ 8 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, प्रोटीनच्या कमतरतेचा आहे इशारा