Pimpri Crime | ‘माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तर… ‘ 26 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Pimpri Crime । माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तरी माझे कोणीही वाकडं करू शकत नाय’ अशा शब्दात धाक दाखवत व्याजाच्या बदल्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. तर, फोनमध्ये व्हिडिओ (Video) करून ब्लॅकमेल (Blackmail) देखील केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक (Arrested) केली आहे. याबाबत घटना मावळ तालुक्यातील सोमाटणे तसेच, दिल्ली पठाणकोट, अमृतसर, सुरत गुजरात या ठिकाणी मार्च ते 8 ऑगस्ट 2021 या काळात घडल्याचे (Pimpri Crime) समोर आले आहे.

किरण रंभाजी घारे (वय, 40, रा. बेबडओहळ, ता. मावळ), दीपक प्रकाशचंद्र ओसवाल
(वय, 46, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन), अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने सोमवारी (9 ऑगस्ट) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीप्रमाणे, पीडित महिलेनं किरण घारे (Kiran Ghare) याच्याकडून
1 लाख रुपये व्याजाने उसने घेतले होते. त्याबदल्यात त्याला 50 हजार रुपयांचे 2 चेक दिले होते.
मात्र, घारे याने व्याजाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली.

 

दरम्यान, त्याला महिलेने नकार दिला असता त्याने नवरा आणि मुलगा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेला फोरव्हिलर मधून बसून बंदुकीचा धाक दाखवून दिल्ली, पठाणकोट, अमृतसर व सुरत गुजरात
या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केले.
मोबाईलमध्ये त्याचे व्हिडिओ करून पीडित महिलेला ब्लॅकमेल (Blackmail) करून सतत लैंगिक अत्याचार केले.
तसेच, तुमच्या घरी बायका पाठवतो तेव्हा तुम्ही पैसे द्याल, अशी देखील धमकी देखील आरोपी घारेने दिली आहे. परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने फिर्यादीवर अत्याचार केला आहे.
तसेच, घारे हा गुंड प्रवृत्तीचा माहित असतानाही ओसवाल याने महिलेशी त्याची ओळख करून दिली.
यातून ओसवालने महिलेची फसवणूक केली, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
याप्रकरणी तपास पोलीस निरीक्षक शहाजी पवार (Police Inspector Shahaji Pawar) करत आहेत.

 

Web Title : pimpri crime | Sexual harassment of 26 years old girl in talegaon dabhade area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ujjwala Yojana | उज्ज्वला योजना 2.0 : जाणून घ्या कशी लाभदायक आहे ही सरकारी योजना आणि तुम्ही कसा घेऊ शकता लाभ

Pimpri Crime | भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच लगावली कानाखाली, एकाला अटक

Indo-Tibetan Border Police | कडक सॅल्यूट ! उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून PI वडिलांनं केला ‘सलाम’