Pimpri Crime | विनामास्क कारवाई करणार्‍या पोलिसाला दोघांकडून दांडक्याने मारहाण

पिंपरी : Pimpri Crime | कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी बाहेर फिरणार्‍यांवर मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणार्‍यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. असे असतानाही अनेक जण विना मास्क फिरत असतात. अशा विनामास्क फिरणार्‍यांवर कारवाई करीत असताना दोघांनी पोलीस कर्मचार्‍यावर लाकडी दांडक्याने डोळ्यावर, कपाळावर मारहाण करुन (Pimpri Crime) जखमी केले.

रामदास सोपान लुकर (Ramdas Sopan Looker) (वय ६५, रा. लुकर चाळ, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) आणि सतीश पवार (Satish Pawar) (वय ४०, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यातील (Pimpri Police) पोलीस शिपायाने फिर्याद दिली आहे. ही घटना मोरवाडी येथील लालटोपीनगर येथे शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजता घडली. फिर्यादी हे विना मास्कची कारवाई करीत असताना आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना शिवीगाळ करुन दंडाच्या पावतीचे पुस्तक हिसकावून घेतले. फिर्यादी यांच्या अंगाशी झटापट करुन त्यांची नोकरी घालविण्याची धमकी दिली. आरोपींना ते पोलीस चौकीत घेऊन जात असताना सतीश पवार हा त्यांच्या हाताला हिसका देऊन पळून गेला. रामदास लुकर याने तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोळ्यावर, कपाळावर मारुन जखमी करुन सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे (Sub-Inspector of Police Kokate) तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

AIIMS | कपड्याच्या मास्कने वाढला धोका ! जाणून घ्या AIIMS च्या रिसर्चमध्ये झालेला खुलासा

Tokyo Olympics | टोकियोतून आशादायक बातमी ! थाळीफेकमध्ये कमलप्रीतने दाखविली कमाल; फायनलमध्ये केला प्रवेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  pimpri crime | two person beat pimpri chinchwad police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update