Pimpri Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा खून, पतीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime | कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना देहूरोड (pimpri crime) येथे घडली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना निगडी (Nigdi sector no. 26) येथील सेक्टर नंबर. 26 येथे शनिवारी (दि.31) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

वैष्णवी चेतन पवार (वय-22 रा. फ्लॅट नं. 284, आकाश बिल्डिंग, सेक्टर नंबर 26, निगडी प्राधिकरण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती चेतन गोविंद पवार (वय-27) याला अटक केली आहे. याप्रकरणी वैष्णवीची आई मिना सुरेश वाघेरे (वय-46 रा. वाघेरे आळी, पिंपरी गाव, पिंपरी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वैष्णवी आणि आरोपी चेतन हे सेक्टर नं. 26 निगडी प्राधिकरण (nigdi pradhikaran) येथे राहतात. त्यांच्यामध्ये शनिवारी रात्री किरकोळ कारणावरुन भांडण झाले. या भांडणाच्या रागातून पीत चेतन याने वैष्णवीचा गळा आवळून तेसच कपाळावर जखम करुन तिला ठार मारले. याप्रकरणी रविवारी (दि. 1 ऑगस्ट) पहाटे गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतनला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) करीत आहेत.

हे देखील वाचा

Coronavirus | केंद्राकडून राज्याला अलर्ट ! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण Lockdown होणार?

One Crore | 11 वर्षाच्या मुलीने लॅपटॉपवरून वडीलांच्या फोनवर पाठवला मेसेज, ’एक कोटी द्या अन्यथा…’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Crime | Wife murdered in family dispute, husband arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update