दोघांकडून दोन पिस्तूल, तीन काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांकडून दोन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली.
वसीम शफिकोद्दीन मणियार (25, रा. जुनी सांगवी) आणि अनिकेत उर्फ सोन्या अशोक बाराते (21, रा. दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई हेमंतकुमार प्रकाश गुत्तिकोंडा यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चंद्रकांत भिसे यांना माहिती मिळाली की ममता नगर जुनी सांगवी येथील दत्ताश्रम शेजारी दोन संशयित इसम थांबले आहेत. त्यांच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात सापळा रचून वसीम आणि अनिकेत या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा ऐवज जप्त केला असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली पोलीस तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा

You might also like