पिंपरी : नोकरी टिकवण्यासाठी केली शरीर सुखाची मागणी ; शाळा समिती अध्यक्षांवर विनयभंगाचा गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

नोकरी टिकवण्यासाठी प्राध्यापिकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या शाळा समिती अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणीक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पिंपरी येथील भारतीय जैन संघटना शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून मोठा राजकीय हस्तक्षेप झाला. पोलीस अधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे फोन आले. मात्र पीडित महिला गुन्हा दाखल करण्यावर ठाम असल्याने शाळा समिती अध्यक्षासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शाळा समिती अध्यक्ष अरुण नहार (५०, रा. औंध), एस.डी. कदम (५२, रा. वाघोली), बी. बी. चौघुले (६३, रा. चतुशृंगी) आणि कोचर (५२, रा. वडगाव शेरी) या चोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नहार हा पिंपरी येथील भारतीय जैन संघटना शाळेच्या समिती अध्यक्षपदी आहे. तर इतर शाळेतील शिक्षक, कर्मचारी आहेत. पीडित महिला या शाळेत कामाला होत्या. दरम्यान नहार याची शाळा समिती अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनतर वेळोवेळी नहार ही वेगवेगळी मागणी करून त्रास देऊ लागला. तर इतरही नहार याला साथ देत होते. नोकरी टिकवायची असल्यास नहार सांगतात तसे करा असे यांनी पीडित महिलेस सांगितले. मात्र पीडित महिलेने नहार याच्या चुकीच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला. नहार याने वारंवार अश्लील बोलून विनयभंग केला. नहार याने चिडून वेगवेगळे आरोप लावून कामावरून काढण्यात आल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल

पीडित महिलेने झालेल्या प्रकाराची महिती एप्रिल महिन्यात लेखी स्वरूपात दिली होती. सर्व वरिष्ठांना याबाबत माहिती देण्यात आली होती. तरी देखील गुन्हा दाखल करण्यास तीन महिने लागले.

राजकीय दबाव…

गुन्हा दाखल असलेले नहार याचे राजकीय चांगले संबंध आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी हितसंबंध असल्याने पोलिसांवर दबाव आला होता. त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास अनेक दिवस लागले.

पोलिसांमुळे अटक पूर्व जामीन

गुन्हा दाखल न करण्यासाठी पीडित महिलेवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्यात आला. गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी वेळ केला. पीडित महिला ठाम असल्याचे लक्षात आल्याने गुन्हा दाखल झालेल्याने अटकपूर्व जमीन मंजूर करून घेतला. याला पोलिसांचे चांगलेच सहकार्य लाभले. एकीकडे महिलांनी आत्याचार सहन करु नका अत्याचार झाल्यास पोलिसांकडे तक्रार नोंदवा असे सांगणारे पोलिसच गुन्हेगारांना मदत करत आहेत.