Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवडमध्ये उपलब्ध करुन दिला जातोय ‘घरपोच’ भाजीपाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे सध्या देशावर मोठे संकट आहे. लोक कोरोनामुळे घरात बसून आहेत, लॉकडाऊन नंतर लोकांना आपल्या घरातून बाहेर पडता येत नाही. परंतु लोक अत्यावश्यक वस्तु, किराणा, भाजीपाला आणि औषधं घेण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. पण यामुळे कोरोना पसरु शकतो. कारण कोरोनाची लक्षण सुरुवातीला लक्षात येत नाहीत. असे असल्याने लोकांनी घरात राहावे असे आवाहन सरकारने केले आहे.

यादरम्यान आता लोकांना चिंता आहे ती त्यांच्यापर्यंत अत्यावश्यक वस्तू, पदार्थ कसे पोहोचणार. परंतु काही संस्थांकडून, कंपन्यांकडून लोकांची ही चिंता दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकांना दिलासा मिळावा म्हणून प्रयत्न होताना दिसत आहेत. लोकांना मदतीचा हात देण्यासाठी या संस्था, कंपन्या, स्वयंसेवा संस्था प्रयत्न करत आहेत.

असाच प्रयत्न पिंपरी-चिंचवड परिसरात होताना दिसत आहे. दुधाळ फॉर्म्स प्रोड्यूसर कंपनीकडून लोकांना घरोघरी कोरोनासाठी आवश्यक असलेले मास्क, सॅनिटाइजरचं मोफत वाटप केलं जात आहे. जेणे करुन तेवढ्यासाठी लोक घराबाहेर पडून नयेत. याशिवाय या कंपनीकडून लोकांना घरपोच माफक दरात भाजीपाला उपलब्ध करुन दिला जात आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर मार्केटमध्ये भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करण्याची वेळ येणार नाही.

दुधाळ फॉर्म्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक चेतन प्रकाश दुधाळ यांच्या प्रयत्नातून आकुर्डी, पिंपरी, चिंचवड, रावेत, प्रधिकरण इत्यादी ठिकाणी जनतेला भाजीपाला, मास्क, सॅनिटायझर, फळे यांचे वाटप केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांच्याकडून लोकांना सहाय्य केलं जात आहे. त्यांच्या या प्रयत्नाने लोकांना मोठा दिलासा मिळत आहे.