Pimpri : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून ‘सामाजिक सुरक्षा’ पथकाची स्थापना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्यापासून कार्यरत नसलेल्या सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना सोमवारी करण्यात आलेली आहे. या पथकात तीन अधिकारी आणि नऊ कर्मचारी यांची पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नियुक्ती केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. त्यानंतर शहरात गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली. शहरात पाच गुन्हे शाखा पथक, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, आमली पदार्थ विरोधी, खंडणी, दरोडा विरोधी पथक, सायबर गुन्हे शाखा, वाहन चोरी विरोधी पथक स्थापन करण्यात आली. मात्र सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात आलेली नव्हती.

शहरात, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत देहविक्री, ‘स्पा’च्या नावाखाली वेगळेच उद्योग सुरु होते. यामुळे शहरात स्वतंत्र सामाजिक सुरक्षा विभागाची आवश्यकता होती. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहत तत्काळ या पथकाची स्थापना केली आहे.

या पथकात पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक मारुती डोंगरे, सहाय्यक फौजदार विजय लक्ष्मण कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, मारोती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.