पिंपरी : बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   करारनाम्याप्रमाणे ठरलेली जागा न देता, त्या जागेची परस्पर विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील बांधकाम व्यावसायिकासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 25 फेब्रुवारी 1998 ते 22 जुलै 2020 या कालावधीत धनंजय राजपार्क बिल्डींग, केशवनगर, चिंचवड येथे घडली.  मनोहर शंकर गावडे (56, रा. केशवनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर मे. एच. ए. डेव्हलपर्स नोंदणीकृत भागीदार संस्था रोझलॅंड रेसिडन्सी- पिंपळे सौदागर, रेश्‍मा सुनील चुगवानी (50, रा. चुगवानी कुटीया, पिंपरी), विनोद प्रेमचंद चागवानी (49, रा. डेअरी फार्म रोड, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे यांनी आपली जागा विकसित करण्यासाठी चुगवानी यांच्या सोबत करारनामा केला होता. मात्र ठरल्याप्रमाणे गावडे यांना जागा दिली नाही. तसेच त्या जागेची परस्पर विक्री केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक निरीक्षक आर. आर. ठुबल करीत आहेत.