‘अश्लील’ फोटो आणि ‘व्हिडीओ’च्या धमकीनं ‘बलात्कार’, नंतर ‘गर्भपात’ केल्याप्रकरणी बिल्डर सुधीर कर्नाटकीवर गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर सुधीर कर्नाटकीवर अनैसर्गिक बलात्कार आणि गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भादंवी कलम 376, 313, 323, 504, 506, 420 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर आणि पिडीत महिलेची एका नृत्याच्या प्रोग्राममध्ये ओळख झाली होती. त्यावेळी आरोपी सुधीर याने महिलेचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर त्यांच्याशी फोनवर बोलून ओळख वाढवली. तसेच लग्नाची मागणी घातली. परंतु फिर्यादी यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपीने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच फसवणूक करून त्यांना एक फ्लॅट भाड्याने घेऊन दिला. तसेच त्याठिकाणी शितपेयामधून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला. ते मोबाईल मध्ये रेकॉर्डकरून घेतले.

त्यानंतर परत त्या फ्लॅटवर जाऊन शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. पिडीत महिलेने विरोध केला असता फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनैसर्गिक कृत्य केले. तर पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर त्यांच्या समंतीशिवाय गर्भपात केला. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –