Pimpri Fire | शाळेजवळील कंपनीला भीषण आग; 400 विद्यार्थ्यांना काढले बाहेर, आकुर्डीमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Fire | आकुर्डी येथे अगरबत्ती तयार करण्याच्या कारखान्याला आज (मंगळवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. या कारखान्याच्या जवळच एक शाळा असून, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे शाळेतील सुमारे 400 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. आगीची ही घटना आकुर्डी (Pimpri Fire) येथील पांढरकरनगर येथे घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरकरनगरमधील अगरबत्तीच्या कारखान्याला अचानक आग लागली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारी असलेल्या पत्राशेडच्या घरांना याची झळ बसून नुकासान झाले. शाळेजवळ आग लागल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेजवळ मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी आग लागल्याची माहिती पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाला दिली.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मोठ्या प्रमाणात आग लागली असून,
अगीचे लोट व धूर मोठ्या प्रमाणात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

 

Web Title :- Pimpri Fire | fire at agarbatti company adjacent to akurdi school 400 students were expelled

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात