आगीत ‘व्हेराक’ कंपनी जळून ‘खाक’, एक जण होरपळला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – हिंजवडी फेज दोन मध्ये गाड्यांचे पार्ट तयार करणाऱ्या ‘व्हेराक’ कंपनीत आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून एकजण जखमी झाला आहे. ही आग पहाटे साडे तीनच्या सुमारास लागली असून सकाळी साडे सातच्या सुमारास विझली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी फेज दोन मध्ये गाड्यांचे हेडलाईट आणि इलेक्ट्रिक साहित्य बनविणारी ‘व्हेराक’ कंपनी आहे. या ठिकाणी गाड्यांचे पार्ट तयार केले जातात. सोमवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली. क्षणार्धात आगीने उग्र रूप धारण केले. कर्मचारी आणि अधिकारी यांनी प्रसंगांवर्धन राखत बाहेर पळ काढला. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलास दिला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अथक प्रयत्नानंतर मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले. मात्र तो प्रयत्न कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली होती. तर एक कर्मचारी भाजला आहे.

You might also like