घराचा जबरदस्तीने ताबा घेणाऱ्या 17 जणांवर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सिद्धाई गार्डन, चिखली प्राधिकरण येथे जबरदस्तीने घरात घुसून, लोकांना शिवीगाळ व मारहाण करत घराचा ताबा घेतल्याप्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी एकच्या सुमारास घडली.

महादेव येगडे, संतोष येगडे व इतर १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती संजय चौगुले (४३, रा. सिद्धाई गार्डन, चिखली प्राधिकरण) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरती व आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून जमिनीचा वाद आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास आरती यांच्या घरात आरोपींनी जबरदस्तीने प्रवेश केला. आरोपींनी घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल काढून घेतले. त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व मारहाण करत घरातील सर्व सामान घराच्या बाहेर टाकून दिले. जबरदस्तीने घराचा ताबा घेतला. तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com