पिंपरी : खुनातील फरार आरोपी चार तासात अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तरुणाचा खुन करुन फरार झालेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखा पाचच्या पथकाने चार तासात अटक केली. देहूगाव येथे एका अज्ञात इसमाची हातपाय बांधलेली बॉडी गाथा मंदीर, देहुगाव, येथील इंद्रायणी नदी पात्रात मिळुन आली होती. सदर अज्ञात इसमाचा अज्ञात आरोपींनी अज्ञात करणांकरीता खुन केला असल्याने देहुरोड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा, युनिट 5 करीत होते.

मयत अज्ञात इसम कोण आहे याची चौकशी करीत असाताना सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलिस नाईक दत्तात्रय बनसुडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, सदरची डेडबॉडी ही सुनिल नावाचे कामगाराची असुन तो इंद्रायणी नदीचे कडेला शेतामध्ये राहत असतो. त्याअनुशंगाने सखोल तपास केला असता सदरची डेड बॉडी ही सुनिल रामराव मरजकोले (35, रा. अंतरगाव पालुटी, कळंब, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्याअनुशंगाने मयत इसम कोणासोबत राहत होता याची सखोल चौकशी केली असता तो टायगर, पवन, महेंद्र व अजुन एक व्यक्ती यांचेसोबत राहत असल्याची माहिती मिळाली. गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी काढुन त्यांचा शोध घेतला असता त्यापैकी टायगर, पवन, महेंद्र यांना सांगुर्डी फाटा येथुन ताब्यात घेतले.

अनिकेत ऊर्फ टायगर बाबुराव शिंदे (19, रा विठठल रामभाउ कुंभार यांचे प्लॉटींग इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे मुळ गाव मु.पो. उमरखेड, ता उमरखेड जि यवतमाळ), पवन किसन बोरोले (26, रा विठठल रामभाउ कुंभार यांचे प्लॉटींग इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे रा. आटमोडी, ता. राळेगाव, जि यवतमाळ), आणि महेंद्र विजय माने (38, रा विठठल रामभाउ कुंभार यांचे प्लॉटींग इंद्रायणी नदी काठी, देहुगाव, जि. पुणे मुळ रा. गवळीनगर, गावडे चाळ, भोसरी पुणे) यांना अटक केली.

दारु पिण्याच्या वादातून, लाथा बुक्क्यांनी तोंडावर पंच मारुन, डोक्यात दगड मारुन, पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने हातपाय बांधुन त्यास दगड बांधुन इंद्रायणी नदीपात्रामध्ये टाकुन, त्यास जिवे मारले असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्री सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-5 चे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, फारुक मुल्ला, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, श्यामसुदर गुट्टे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे, सावण राठोड, गणेश मालुसरे, नितीन बहिरट, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम, नागेश माळी यांनी केली आहे.