मित्रांना बोलावून अतिप्रसंग करण्याची धमकी देत मित्रानेच केला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जबरदस्तीने फ्लॅटवर नेऊन, इतर मित्रांना बोलावून सामूहिक अत्याचार करण्याची धमकी देत मित्राने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 26) बावधन येथे घडली.

याप्रकरणी 23 वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिखर अजय भार्गव (22, रा. मिडोज सोसा. बावधन) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे दोघे मित्र आहेत. सोमवारी आरोपीने तरुणीला जेवण करण्याच्या बहाण्याने त्याच्या कार मध्ये बसवून जबरदस्तीने फ्लॅटवर नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने प्रतिकार केला असता आरोपीने आणखीन मित्र बोलावून सामूहिक अत्याचार करण्याची धमकी दिली. तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत

फेसबुक पेज लाईक करा