पिंपरीत ‘मटका क्वीन’सह 5 जणांना अटक, 3 लाखाची रोकड जप्त, अवैध धंद्येवाल्यांचे धाबे दणाणले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालविणाऱ्या महिलेस पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. मटका अड्यावरुन दोन लाख 99 हजार 800 रुपयांची रोकड आणि पत्ते जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

अनिता परमानंद तखतवानी (47, रा. पिंपरी), परमानंद चतुरमल तखतवानी (48, रा. पिंपरी), विशाल शांताराम कांबळे (40, रा. पिंपरी), महेश रामचंद्र कुरेशी (42, रा. पिंपरी) आणि सचिन जगदीश सौदे (25, रा. पिंपरी) या पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पिंपरी कॅम्प येथील हॉटेल जायका येथील एका इमारती मध्ये मटका आणि जुगार सुरु असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहायक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मिलिंद वाघमारे, राजेंद्र निकाळजे (गुन्हे), उप निरीक्षक रमेश केंगार आणि त्यांच्या पथकाने छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी दोन लाख 99 हजार 200 रुपये आणि 35 पत्त्यांचे कॅट आढळून आली आहेत. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.