पिंपरी : रुग्णांना लुबाडणार्‍या हॉस्पिटलवर शासनाचा कारवाईचा ‘बडगा’ ! जादा घेतलेले बिलाचे पैसे परत न केल्याने चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटल ‘गोत्यात’; 4 डॉक्टरांविरुद्ध FIR

पिंपरी : रुग्णाला कोविड १९ उपचारादरम्यान अवाजवी अडीच लाख रुपयांचे जादा लावलेले बिल आदेश दिल्यानंतरही परत न केल्याने चाकण क्रिटीकेअरच्या ( Criticare Hospital)  संचालकांवर शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. चौघा डॉक्टरांवर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

 

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

 

डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. सीमा गवळी आणि डॉ. घाटकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी, विजय लक्ष्मण पोखरकर (रा. ओझर) हे चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये ( Criticare Hospital)   कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी २ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२० या काळात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

 

Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या

 

हॉस्पिटलने अवाजवी बिल करुन रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्याची वसुली केली होती. पुष्पा पोखरकर यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे व त्यांच्या सहकार्‍यांनी बिलाची तपासणी केली. त्यात हॉस्पिटलने सुमारे ४ लाखांहून अधिक बिल केले होते. त्यापैकी २ लाख ५३ हजार ३०० रुपये हे शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक आकारणी केलेली आढळून आली. त्यानंतर शासनाच्या वतीने हॉस्पिटलला हे जादा आकारणी केलेल्या बिलाची रक्कम पुष्पा पोखरकर यांना परत करण्याचा आदेश दिला होता. वारंवार सांगूनही चाकण क्रिटीकेअर हॉस्पिटलने ( Criticare Hospital)  शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता हॉस्पिटलच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Also Read This : 

पिंपरी : अनैतिक संबंधावरुन जाब विचारणार्‍या पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पतीला अटक

 

साखर खाण्या ऐवजी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, गोड खाणं सोडल्याशिवाय मधूमेह अन् वजन वाढण्यापासून राहा दूर, जाणून घ्या

 

 

Aadhaar e-KYC च्या माध्यमातून घरबसल्या उघडू शकता NPS account, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

 

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच

 

 

दिलासादायक बातमी ! जर टोल प्लाझावर 10 सेकंदपेक्षा अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली तर द्यावा लागणार नाही टॅक्स