Pimpri : मैत्रिणीसमोर शिवी दिल्यानंतर 100 जणांच्या टोळक्यानं घातला धुडगूस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरीमध्ये ( Pimpari) घोळक्याने धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. मैत्रिणीसमोर शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यावरून सुरुवातीला झालेल्या हाणामारीचे रूपांतर शहरभर धुडगूस घालण्यापर्यंत गेले. यामध्ये दोन गटांतील १०० जण सहभागी झाले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून दोन्ही बाजूंनी पोलिसांविरोधात तक्रार ( Complaint) दाखल करण्यात आली आहे. या घटनेविषयी सविस्तर मिळालेली माहिती अशी, की संत तुकारामनगर, पिंपरी येथील महेशनगर चौकात चौपाटी आहे. तेथे एक युवक आणि त्याची मैत्रीण खाद्यपदार्थांच्या गाडीवर थांबले होते. तेव्हा त्या युवकाने मैत्रिणीच्या अन्य एका मित्राला शिवीगाळ केली. तेव्हा तेथे आणखी एक जण होता. त्याने माझ्या मित्राला मुलीसमोर कशाला शिवीगाळ करतो, असा जाब विचारला. त्यावरून तेथे हाणामारी झाली.

याची माहिती अजमेरा, नेहरूनगर, खराळवाडी येथे राहणाऱ्या मित्रांमध्ये पसरली. त्यानंतर सुरुवातीला ज्याला मारहाण झाली त्याचा बदला म्हणून काही जणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर याचा बदला म्हणून नेहरूनगर येथे १०० जणांच्या टोळक्याने तोडफोड केली. त्याचबरोबर या घोळक्याने दोन बसेसची तोडफोड देखील केली. त्याचबरोबर एका वृद्धांच्या गळ्यातून सोन्याची साखळी देखील हिसकावून दिली. त्यानंतर खराळवाडी येथील एका घरात घुसून या घराची देखील त्यांनी तोडफोड केली.

पिंपरी पोलीस ठाण्यात अवघे चार पोलीस अधिकारी
साध्य पिंपरी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची वानवा आहे. या ठिकाणी केवळ चार पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे तीन पोलीस चौक्या आणि पोलिस ठाण्यात एक असे अधिकारी नेमल्यावर तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवरच सर्व कामकाज चालविण्याची कसरत सध्या पिंपरीच्या निरीक्षकांना करावी लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि संख्या वाढवण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.